मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री शनैश्वराचे दर्शन – महासंवाद

0 7




मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री शनैश्वराचे दर्शन – महासंवाद

अहिल्यानगर, दि.११- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिशिंगणापूर येथे श्री शनैश्वराचे दर्शन घेऊन पूजा केली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री शनैश्वर मूर्तीस व उदासी महाराज मठात अभिषेकही करण्यात आला.

यावेळी जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, आमदार शिवाजीराव कर्डीले उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे शिर्डी विमानतळ येथे स्वागत

तत्पूर्वी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिर्डी विमानतळ येथे आगमन झाले.  जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. तर शनिशिंगणापूर हेलिपॅड येथे आमदार शिवाजीराव कर्डिले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी  त्यांचे स्वागत केले.







Source link

Leave A Reply

Your email address will not be published.