मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन – महासंवाद
अहिल्यानगर, दि.११- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डी येथे श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. श्री. फडणवीस यांनी गुरूस्थान मंदिराचेही दर्शन घेतले.
त्यांच्यासमवेत जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी मुख्यमंत्र्यांना श्री साईबाबा चरित्र ग्रंथ देऊन त्यांचा सत्कार केला.