केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केला तक्रारीचा तात्काळ निपटारा – महासंवाद

0 5




केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केला तक्रारीचा तात्काळ निपटारा – महासंवाद

बुलढाणा, दि. 2(जिमाका) : केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे आज बुलढाणा दौऱ्यावर आले असता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात बसुन नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावले. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील मतदारांना येणाऱ्या अडचणी संदर्भात त्यांनी थेट संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून तक्रारींचा ऑन द स्पॉट निपटारा केला.

या दरम्यान केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून शासनाच्या योजनाची प्रभावी अंमलबजावणी करावी. वन्यप्राण्यापासून होणाऱ्या पिकांच्या नुकसानीसंदर्भात उपाययोजना करावे. शेतकऱ्यांचे विज प्रश्न मार्गी लावण्यासाठी सौर उर्जा प्रकल्पाना गती द्यावी. शासकीय जमीनीवर फळबाग लागवड, शेततळे निर्माण करुन शासनाच्या उत्पन्नात वाढ करण्यासंदर्भात नियोजन करावे. मानव व वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी झटका मशीन उपलब्ध करुन द्यावे. त्यासाठी शेतकऱ्याचे सामूहिक अर्ज स्विकारुन त्यांना झटका मशिन उपलब्ध करुन द्यावे, आदी निर्देश यावेळी दिले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

000000







Source link

Leave A Reply

Your email address will not be published.