माजी आमदार प्रदीप नाईक यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली – महासंवाद

0 12




माजी आमदार प्रदीप नाईक यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली – महासंवाद

मुंबई, दि. 01: “किनवटचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या निधनाने धडाडीचा लोकप्रतिनिधी, कर्तव्यनिष्ठ लोकसेवक हरपला आहे.  त्यांच्या निधनाने किनवटच्या सामाजिक जीवनाशी घट्ट नाळ जुळलेले व्यक्तिमत्त्व हरपले आहे. किनवट विधानसभा मतदार संघाच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. दिवंगत प्रदीप नाईक यांच्या कुटुंबियांच्या, सहकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी असून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.

0000







Source link

Leave A Reply

Your email address will not be published.