हिवाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित – महासंवाद
नागपूर, दि. २१ : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन सोमवार, दि. 3 मार्च 2025 रोजी विधानभवन, मुंबई येथे होणार असल्याची घोषणा विधानपरिषदेत सभापती प्रा. राम शिंदे यांनी केली.
विधानपरिषदेत प्रत्यक्षात 36 तास कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज 6 तास झाले. या अधिवेशनात सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती 87.76 टक्के होती, तर एकूण सरासरी उपस्थिती ही 79.30 टक्के इतकी होती.
विधानपरिषदेत पुर्न:स्थापित 4 शासकीय विधेयके मांडण्यात आली असून 4 विधेयके संमत झाली. विधानसभेने परित करून विधानपरिषदेत आलेली विधेयके 9 आहेत. यामध्ये शिफारशी शिवाय विधानसभेला परत पाठवलेली विधेयके 4 आहेत. परिषदेत 4 शोक प्रस्ताव मांडण्यात आले. अधिवेशनात सहकार्य केल्याबद्दल सभापती प्रा शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.
०००