संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन – महासंवाद
मुंबई, दि. ८ : संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले, संतश्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराजांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या मूळ गाथेचे लेखन करण्याबरोबरच मानवता व लोककल्याणाची शिकवण दिली. त्यांच्या कार्याला कोटी कोटी नमन आहे. यावेळी शासकीय अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
000