मुंबई शहर जिल्ह्यात मतदानाच्या दिवशी दिव्यांग ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी विशेष सुविधा – जिल्हाधिकारी संजय यादव – महासंवाद

0 17

मुंबई शहर जिल्ह्यात मतदानाच्या दिवशी दिव्यांग ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी विशेष सुविधा – जिल्हाधिकारी संजय यादव – महासंवाद

  • दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांनी आवश्यक मागणी ‘सक्षम ॲप’वर नोंदवावी
  • मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांसाठी मोफत वाहन व्यवस्था

मुंबई, दि. १२ : आगामी विधानसभा निवडणुकीत मुंबई शहर जिल्ह्यातील दहा मतदारसंघांमध्ये २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मुंबई जिल्हा निवडणूक यंत्रणेने दिव्यांग आणि ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सुविधा मिळविण्यासाठी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक मतदारांनी सक्षम ॲपद्वारे आवश्यक मागणी नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे.

सक्षम ॲपवर नोंदणी केलेल्या दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी व्हीलचेअर, व्हॅन, ईको व्हॅन, दिव्यांग सुलभ बसेस, टॅक्सी, तसेच मतदान केंद्रांवर जिन्यांवर चढण्यासाठी सरकत्या व्हीलचेअर यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मतदानाच्या दिवशीपर्यंत ‘सक्षम ॲप’वर दिव्यांग व ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक मतदारांना मतदानासाठी सुविधा मागणी नोंदविता येणार आहे. ‘सक्षम मोबाईल ॲप’वर नोंदणी न करू शकलेल्या काही दिव्यांग व ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची सुविधेसाठी मागणी नोंदविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी सांगितले.

भौतिक सुविधारॅम्पआणि व्हिलचेअर

दिव्यांग मतदारांकरिता मतदान केंद्रावर सुव्यवस्थित पोहचण्याकरिता, इमारतीत अधिक सहजपणे प्रवेश करण्यास किंवा भिन्न उंचीच्या भागात सुलभतेने पोहचण्यासाठी प्रत्येक मतदार केंद्राच्या दर्शनी भागामध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी प्रवेशसुविधा रॅम्पच्या माध्यमातून सुलभ केली जाणार आहे. तसेच मतदान प्रक्रियेत मदतीशिवाय सहभाग घेता यावा यासाठी ब्रेल चिन्हे असलेली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) देखील उपलब्ध असतील. अंध मतदारांसाठी ब्रेल मतपत्रिका, मतदार स्लिप ब्रेल लिपीमध्ये वाटण्यात आलेली आहे. अंध मतदारांकरिता प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी ब्रेल डमी, डमी मतपत्राला प्रत्येक मतदार केंद्रावर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दिव्यांग मित्र आणि मोफत वाहतूक व्यवस्था

दिव्यांग मतदारांना मदत करण्यासाठी दिव्यांग मित्र समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या ६७१ स्वंयसेवकांची नेमणूक मतदारांना मदत करण्यासाठी केली आहे. मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांसाठी १० विधानसभा मतदारसंघात मोफत बस सुविधा असेल. दिवसभर १० रिंगरूटवरील २४३ मार्गांवर दिव्यांग मतदारांना मोफत बस प्रवासाची सुविधा देण्यात येणार आहे.

मुंबई जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांसाठी नियुक्त समन्वयक दिलीप यादव (मो. क्र. ९५९४१४४९९९) यांच्याशी संपर्क साधल्यास वाहन सुविधा उपलब्ध केली जाईल. दिव्यांग मतदारांनी रांगेत उभे न राहता मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.  मुंबई शहर प्रशासन आणि दिव्यांग समन्वय अधिकारी यांच्यामार्फत सर्व दिव्यांग मतदारांना या सुविधांचा लाभ घेऊन मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

0000

 

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.