चेंबूर विधानसभा मतदारसंघात साड्या वाटणाऱ्यांविरुद्ध तक्रार – महासंवाद

0 3




चेंबूर विधानसभा मतदारसंघात साड्या वाटणाऱ्यांविरुद्ध तक्रार – महासंवाद

मुंबई, दि. ०४: चेंबूर विधानसभा मतदारसंघात मतदारांना प्रलोभन म्हणून साड्या वाटणाऱ्यांविरुद्ध अदखलपात्र तक्रार दाखल करण्यात आली आहे.

३ नोव्हेंबर २०२४ रोजी, चेंबूर विधानसभा मतदारसंघातील मनपा वार्ड क्र. १५३, घाटला येथील शिवशक्ती रहिवाशी संघाजवळील कर्नाटक शाळेच्या परिसरात निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी मतदारांना भुलवण्याच्या उद्देशाने साड्यांचे वाटप करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली.

संबंधित विधानसभा मतदारसंघातील भरारी पथकाने तात्काळ पाहणी केली. प्राप्त व्हिडिओच्या आधारे भरारी पथकाने गोवंडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, गोवंडी पोलिस ठाण्यात भगवान बोडके आणि एका अनोळखी महिलेविरुद्ध अदखलपात्र तक्रार नोंदवण्यात आली आहे.







Source link

Leave A Reply

Your email address will not be published.