भायखळा विधानसभा मतदारसंघातील प्रौढ आणि दिव्यांग मतदारांसाठी गृह टपाली मतदानासाठी २५ पथके गठित – महासंवाद

0 1

भायखळा विधानसभा मतदारसंघातील प्रौढ आणि दिव्यांग मतदारांसाठी गृह टपाली मतदानासाठी २५ पथके गठित – महासंवाद

मुंबई, दि. ३० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी भायखळा विधानसभा मतदारसंघातील प्रौढ आणि दिव्यांग मतदारांना गृह टपाली मतदानासाठी २५ पथके गठित करण्यात आली आहे. २० नोव्हेंबरच्या मतदानासाठी अर्ज दाखल केलेल्या मतदारांना गृह टपाली मतदानाची सुविधा १४ ते १६ नोव्हेंबरदरम्यान उपलब्ध होणार आहे.

मतदान केंद्रावर उपस्थित राहू न शकणारे निवडणूक कर्तव्याच्या कामावर असलेले अधिकारी आणि कर्मचारी तसेच अत्यावश्यक सेवेत कार्यरत पोलिसांना ‘प्रपत्र १२ ड’  दाखल केलेल्यांसाठी टपाली मतदान करण्यासाठी खास केंद्रे उभारण्यात आली आहेत.

भायखळा विधानसभा मतदारसंघात १८९ प्रौढ आणि ४९ दिव्यांग मतदारांसाठी, गृह टपाली मतदान १४ ते १६ नोव्हेंबर २०२४ दरम्यान सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत होईल.

भायखळा विधानसभा मतदारसंघ कार्यालय, रिचर्डसन अँड क्रूडास लिमिटेड, तळ मजला हॉल, जे. जे. रोड, ह्युम हायस्कूल शेजारी, भायखळा येथील शेड क्र. १ मधील मंडप क्रमांक १ येथे टपाली मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. हे केंद्र १६ ते १८ नोव्हेंबर २०२४ दरम्यान सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत खुले राहील.

अत्यावश्यक सेवेत कार्यरत पोलिसांसाठी टपाली मतदान , रिचर्डसन अँड क्रूडास लि., तळ मजला हॉल, जे. जे. रोड, ह्युम हायस्कूल शेजारी, भायखळा येथील आवारातील शेड क्र. १ मधील मंडप क्रमांक २ येथे मध्ये उपलब्ध आहे, ज्या ठिकाणी १६ ते १८ नोव्हेंबर २०२४ दरम्यान सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत मतदान करता येईल. भायखळा विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रौढ आणि दिव्यांग मतदार, तसेच निवडणूक कर्तव्याचे अधिकारी आणि पोलिसांनी टपाली मतदानाची सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रतिभा वराळे यांनी केले आहे.

०००००

शैलजा पाटील/विसंअ

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.