राज्यपाल रमेश बैस यांनी घेतले काळारामाचे दर्शन
नाशिक, दि. ५ जानेवारी, २०२४ (जिमाका वृत्तसेवा) : राज्यपाल रमेश बैस यांनी आज काळाराम मंदिरात जाऊन काळारामाचे दर्शन घेतले. त्यानंतर राज्यपाल श्री बैस. यांच्या हस्ते काळाराम मंदिरात विधीवत पूजा व आरती करण्यात आली.
यावेळी काळाराम मंदिर संस्थानचे मुख्य महंत व विश्वस्त यांच्या तर्फे राज्यपाल रमेश बैस यांना श्रीराम यांची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
राज्यपाल यांच्यासोबत काळाराम मंदिर दर्शन प्रसंगी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महानगरपलिका आयुक्त डॉ.अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, काळाराम मंदिराचे मुख्य महंत आचार्य महामंडलेश्वर सुधीरदास महाराज, काळाराम मंदिर संस्थानचे विश्वस्त धनंजय पुजारी, मंगेश पुजारी, नरेश पुजारी, मंदार जानोरकर, एकनाथ कुलकर्णी, पं. प्रणव पुजारी, अद्वय पुजारी आदी उपस्थित होते.
00000000