रेशीम संचालनालयाची गट-क व गट-ड संवर्गातील भरती प्रक्रिया रद्द

0 7

मुंबई दि.१० : रेशीम संचालनालयाने जाहिरात क्रमांक ०१/२०२० नुसार दि. १३ मार्च २०२० अन्वये गट-क व गट-ड संवर्गातील अनुसूचित जमाती या प्रवर्गातील वरिष्ठ तांत्रिक सहायक-२ व प्रयोगशाळा परिचर-१ सरळसेवेची पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याकरीता दि. १३ मार्च  २०२० रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती.  ही भरती प्रक्रिया कोवीड २०१९ व प्रशासकीय कारणामुळे राबविण्यात आली नाही. रेशीम संचालनालयाच्या आस्थापनेवरील १२४ रिक्त असलेली पदे भरण्याचे प्रस्तावित आहे. या रिक्त पदांमध्ये वरील जाहिराती मधील अनुसूचित जमाती प्रवर्गाची पदे समाविष्ठ असल्याने जाहिरात क्रमांक ०१/२०२० दि. १३ मार्च २०२० अन्वये प्रसिध्द करण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करण्यात येत आहे असे नागपूर येथील रेशीम संचालक गोरक्ष गाडीलकर यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

****

 

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.