विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी घेतले बिरोबा देवाचे दर्शन – महासंवाद
सांगली, दि. 24 : महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथे बिरोबा देवाचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर, कवठेमहांकाळ तहसीलदार अर्चना कापसे, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मातोश्री, सुविद्य पत्नी व मुलगा, तसेच माजी आमदार रमेश शेंडगे, जयसिंग शेंडगे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी महाराष्ट्रातील दीनदुबळे, वंचित, शोषित, समाजाला न्याय देण्याचे काम हातून घडावे, अधिक चांगले काम करण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना बिरोबा देवाच्या चरणी केली.
याप्रसंगी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मनोगत व्यक्त केले. माजी आमदार रमेश शेंडगे यांनी आभार मानले.
प्रारंभी आरेवाडी हेलिपॅड मैदान येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.