सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे पर्यटनासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थींच्या मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दुःख व्यक्त
पुणे, दि. १२ : “सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड येथे पर्यटनासाठी गेलेल्या पुणे येथील संकल्प सैनिक अकादमीच्या प्रशिक्षणार्थींचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडून या घटनेची माहिती घेण्यात आली असून अन्य प्रशिक्षणार्थींना त्यांच्या घरी सुखरूप पोहचवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मृत्यू पावलेल्या प्रशिक्षणार्थींच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. समुद्र किनारी, डोंगर दऱ्यांमध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या सर्वांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे कळकळीचे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांनी आहे.”
००००