अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत – पालकमंत्री अनिल पाटील
नंदुरबार, दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ (जिमाका वृत्त) – नंदुरबार जिल्ह्यात २६, २७ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांच्या शेतपिकांचे व मालमत्तेच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश राज्याचे मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा पालकमंत्री अनिल पाटील यांनी जिल्हा प्रशासनास दिले आहेत.
जिल्ह्यात २६ नोव्हेंबर व २७ नोव्हेंबर २०२३ रोजी अवकाळी पाऊस झाला आहे. पावसामुळे शेतकरी बांधवांच्या शेतपिकांचे व अनुषंगिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे. जिल्ह्यातील संबंधित तालुक्यांचे तहसीलदार व तलाठी यांना नुकसानीचे पंचनामे तात्काळ करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची भुमिका शासनाची नेहमिच राहीली आहे, नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांनीही संबंधित तहसीलदार, तलाठी यांच्याशी संपर्क साधून पंचनामे करून घेण्याचे आवाहनही पालकमंत्री अनिल पाटील यांनी केले असल्याचे जिल्हा प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.
000