शहीद जवान अक्षय भिलकर यांच्यावर रामटेक येथे अंत्यसंस्कार
नागपूर दि. १४ : १४-मराठा लाईट इन्फन्ट्री बटालियनचे शहीद जवान अक्षय अशोक भिलकर यांच्यावर आज रामटेक येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
कर्नाटकातील बेळगाव येथे मराठा रेजिमेंट सेंटरवर कार्यरत असताना २६ वर्षीय अक्षय भिलकर यांचा १२ नोव्हेंबर रोजी फिजीकल कॅज्युल्टीमुळे मृत्यू झाला होता. त्यांचे पार्थिव आज विमानाने नागपूर येथे आणण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन त्यांना मानवंदना दिली.
भिलकर यांचे अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ गावी रामटेक येथील अंबाळा घाटावर करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी नातेवाईकांसह, माजी सैनिक व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
०००