पंडित जवाहरलाल नेहरू जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन
मुंबई, दि. १४ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आज येथे विनम्र अभिवादन केले. तसेच पंडित नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या बालदिनाच्याही बालदोस्तांना शुभेच्छा दिल्या आहेत.
वर्षा शासकीय निवासस्थानी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेला मुख्यमंत्र्यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी उपस्थित आमदार दिलीप लांडे, तसेच माजी आमदार रवींद्र फाटक, विजय शिवतारे, डॉ. दीपक सावंत, अभिजीत अडसूळ आदींनीही पंडित नेहरू यांना अभिवादन केले.
०००