अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची ‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत
मुंबई, दि. १३ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘सणांच्या कालावधीत अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठीच्या उपाययोजना’ या विषयावर अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.
सध्या दिवाळी राज्यभरात साजरी होत आहे. घरोघरी मिठाई, फराळाचे पदार्थ, खवा, मावा, खाद्यतेल, वनस्पती तूप इत्यादी अन्न पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. या काळात नागरिकांना सुरक्षित अन्न पदार्थ उपलब्ध व्हावे नागरिकांची कोणतीही फसवणूक होवू नये यासाठी शासनस्तरावर अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत खबरदारी घेण्यात येते. अन्न भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत कशा प्रकारे देखरेख करण्यात येत आहे, नागरिकांनी अन्न पदार्थ खरेदी करताना कोणती खबरदारी घ्यावी इत्यादी विषयावर मंत्री श्री. आत्राम यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमातून मंत्री श्री. आत्राम यांची मुलाखत मंगळवार दि. १४ आणि बुधवार दि. १५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ७:२५ ते ७:४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवार, दि. १४ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ७:३० वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक
एक्स – https://x.com/MahaDGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
०००