माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

0 5

मुंबई, दि.१३ : माजी मुख्यमंत्री व सहकार महर्षी वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव विजय कोमटवार यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव (समिती) सुरेश मोगल, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, सामाजिक कार्यकर्ते यशवंत हाप्पे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

०००

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.