‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. विद्यानंद मोटघरे यांची मुलाखत
मुंबई, दि. 10: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘प्रदूषणमुक्त दीपावली संकल्पना अभियान- 2023’ या विषयावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक डॉ. विद्यानंद मोटघरे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.
भारतीय संस्कृतीत उत्सवांना महत्व असून दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा केला जातो. नागरिकांनी सण-उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्यावतीने राज्यभरात जनजागृतीवर विविध उपक्रमही राबविण्यात येत आहेत. स्वच्छ भारत अभियानासारख्या मोहिमेतून पर्यावरण संवर्धनासाठी काम केले जात आहे. या याबाबतची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक डॉ. मोटघरे ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून देणार आहेत.
‘दिलखुलास’ कार्यक्रमातून डॉ. मोटघरे यांची ही मुलाखत शनिवार दि. 11 आणि सोमवार दि. 13 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत शनिवार, दि. 11 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक संजय भुस्कुटे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक
एक्स – https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
००००