‘आयुष’चे संचालक डॉ. रामन घुंगराळेकर यांची ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या १९ ऑक्टोबरला मुलाखत

0 17

मुंबईदि. 18 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात आयुष संचालनालयाचे संचालक डॉ. रामन घुंगराळेकर यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षणऔषधी द्रव्य विभाग आणि आयुष संचालनालयामार्फत राज्यात 15 सप्टेंबर  ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत आयुर्वेद जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत आयुष संचालनालयाच्या वतीने विविध उपक्रम अणि शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेची अंमलबजावणी आणि नियोजन, या मोहिमेचा मुख्य उद्देश काय आहे याबाबतची माहिती, आयुष  संचालक डॉ. घुंगराळेकर यांनी जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमातून दिली आहे.

जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरुवारदि.19 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. डॉ. प्रज्ञा कापसे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

००००

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.