‘आयुष’चे संचालक डॉ. रामन घुंगराळेकर यांची ‘दिलखुलास’ मध्ये दि. ११, १२ आणि दि. १३ ऑक्टोबरला मुलाखत
मुंबई, दि. 10 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास‘ कार्यक्रमात आयुष संचालनालयाचे संचालक डॉ. रामन घुंगराळेकर यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.
राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्य विभाग आणि आयुष संचालनालयामार्फत राज्यात 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत आयुर्वेद जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत आयुष संचालनालयाच्या वतीने विविध उपक्रम अणि शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेची अंमलबजावणी आणि नियोजन कशा प्रकारे करण्यात आले आहे, या मोहिमेचा मुख्य उद्देश काय आहे याबाबतची माहिती आयुष संचालक डॉ. घुंगराळेकर यांनी ‘दिलखुलास‘ कार्यक्रमातून दिली आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत बुधवार दि. 11, गुरुवार दि. 12 आणि शुक्रवार दि. 13 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर‘ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. डॉ. प्रज्ञा कापसे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
000