विधिमंडळ कामकाजाच्या माहितीसाठी ‘महाअसेंब्ली ॲप’ उपलब्ध

0 10

मुंबई, दि. १९ : विधिमंडळ कामकाजाची दैनंदिन माहिती, बैठका, विविध योजना आदींची माहिती देणारे ‘महाअसेंब्ली ॲप’ उपलब्ध आहे, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत तर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत दिली.

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी हे ॲप (MH Assembly) तयार केले असून विधिमंडळ कामकाजाबाबत माहिती मिळण्यासाठी सर्व सदस्यांनी या ॲपचा वापर करावा, असे आवाहन अध्यक्ष ॲड. नार्वेकर आणि उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी केले आहे.

***

विसअ/अर्चना शंभरकर/ विधानपरिषद/ इतर कामकाज

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.