ठाण्यातील लोकमत महामॅरेथॉन महाएक्स्पोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भेट – महासंवाद

0 9

ठाणे, दि. 3 (जिमाका) – लोकमत समूहाच्या वतीने ठाण्यात आयोजित महामॅरेथॉनच्या निमित्ताने ठाण्यातील रेमंड मैदानातील क्रीडा साहित्याच्या ‘महाएक्स्पो’ प्रदर्शनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन महामॅरेथॉन उपक्रमास व स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, ठाणे हे धावणारे शहर आहे. लोकांना फिट राहण्यासाठी धावणे आवश्यक आहे. कोवीड काळात आरोग्याचे महत्त्व लक्षात आले आहे. त्यामुळे सर्वांनी तंदुरुस्त राहण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. लोकमत समूहाकडून 6 शहरांमध्ये महामॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्यात ठाणे शहराची निवड केल्याबद्दल त्यांनी लोकमत वृत्तपत्र समूहाचे आभार मानले.

यावेळी लोकमतचे राजेंद्र दर्डा, आमदार प्रताप सरनाईक, आमदार निरंज डावखरे, सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे आदी उपस्थित होते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.