मुलुंड आयटीआय येथे मंगळवारपासून तंत्रप्रदर्शन
मुंबई, दि. 28 : मुलुंड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये 29 व 30 नोव्हेंबर, 2022 रोजी जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रशिक्षणार्थींनी तयार केलेल्या तांत्रिक विषयावर आधारित वस्तू व मॉडेलचे तंत्रप्रदर्शन भरविण्यात येणार आहे. हे प्रदर्शन शालेय विद्यार्थी व नागरिकांना पाहण्यासाठी 29 व 30 नोव्हेंबर, 2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4.00 या वेळेत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विजतंत्री इमारत, पहिला माळा, मुलुंड येथे खुले ठेवण्यात येणार आहे.
या प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे, प्राचार्य एस. एस. गोरे यांनी केले आहे.
000
इरशाद बागवान/विसंअ/