पिंपरी चिंचवडमध्ये क्रांतिवीर चापेकर स्मारकाच्या उभारणीस वेग येणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ४१ कोटी निधीस मान्यता – महासंवाद

0 60

पिंपरी चिंचवडमध्ये क्रांतिवीर चापेकर स्मारकाच्या उभारणीस वेग येणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ४१ कोटी निधीस मान्यता – महासंवाद

मुंबई, दि. ३० : पिंपरी चिंचवडमध्ये क्रांतिवीर चापेकर स्मारकासाठी ४१ कोटी निधीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे.

हे स्मारक उभारण्यासाठी १९९७ पासून मागणी होत होती. उपमुख्यमंत्र्यांच्या मान्यतेमुळे आता क्रांतिवीर चापेकर स्मारक उभारणीस वेग येणार आहे.

चापेकर वाडा येथे स्मारक तयार करण्यासाठी सर्वप्रथम  दत्ताजी साळवी, सभापती स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकार समिती यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती.

त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सप्टेंबर, १९९७ मध्ये ठराव मंजूर करुन चापेकर स्मारकाचा २९ लक्ष रकमेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला. त्यानंतर २००२ मध्ये ४४ लक्ष किंमतीचा दुसरा टप्पा पूर्ण करण्यात आला.

मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी जुलै, २०२३ मध्ये  स्थानिक खासदार श्री. बारणे यांच्या विनंतीनुसार यथोचित स्मारक उभारण्यासाठी शासनामार्फत ४१ कोटी देण्याचे निर्देश दिले होते. तत्कालीन उपमुख्यमंत्री व आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील यासंदर्भात निर्देश दिले होते.

आता उपमुख्यमंत्री शिंदे यांनी  चापेकर स्मारकाचे काम  पूर्ण होण्यासाठी ६८ कोटी रकमेच्या आराखड्यास मंजुरी देऊन ४१ कोटी इतक्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे.

स्मारकाच्या या कामात स्थापत्य विषयक कामे, संग्रहालय, ऐतिहासिक कास्य शिल्प, ऑडियो व्हीज्युअल अशा कामांचा समावेश आहे.

000

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.