माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा, सदस्य दिनकरराव जाधव यांना श्रद्धांजली
नागपूर, दि. 16 : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल दिवंगत एस. एम. कृष्णा आणि विधानसभेचे दिवंगत सदस्य दिनकरराव भाऊसाहेब जाधव यांना विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली.
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा, माजी विधानसभा सदस्य दिनकरराव जाधव यांच्या दुःखद निधनाबद्दल विधानसभेत शोक प्रस्ताव मांडला.
००००
एकनाथ पोवार/विसंअ/