‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मंगळवारी प्रा.डॉ. नरेंद्र जाधव यांच्या मुलाखतीचे प्रसारण – महासंवाद
मुंबई, दि. 7 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, लेखक आणि विचारवंत प्रा. डॉ. नरेंद्र जाधव यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे. ही मुलाखत मंगळवार दि. 10 डिसेंबर 2024 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
26 नोव्हेंबर 2024 रोजी देशभरात ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, लेखक आणि विचारवंत, प्रा. डॉ. नरेंद्र जाधव यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीच्या पहिल्या भागातून डॉ. जाधव यांनी संविधान निर्मितीची प्रक्रिया, इतिहास, वैशिष्टे आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे राज्यघटना निर्मितीतील योगदान या विषयावर माहिती दिली. त्या अनुषंगाने ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. जाधव यांच्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागाचे प्रसारण करण्यात येणार आहे. या भागात डॉ.आंबेडकर यांचे लेखन व साहित्य या विषयावर त्यांनी माहिती दिली आहे.
महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत ऐकता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.
एक्स – https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
०००