गोंदिया बस अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रधानमंत्री यांच्याकडून मदतीची घोषणा – महासंवाद
नवी दिल्ली, 29 :- महाराष्ट्रातील गोंदिया येथे झालेल्या भीषण बस अपघातात मृत पावलेल्या प्रवाशांबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. प्रधानमंत्री यांनी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधी’तून मृतांच्या कुटुंबियांसाठी 2 लाख रुपयांची मदत तर जखमी झालेल्या प्रवाशांसाठी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
या दु:खद घटनेबाबत प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी समाजमाध्यम एक्सवर नमूद केले आहे की, महाराष्ट्रात गोंदिया येथे झालेल्या बस अपघातात जीवितहानी झाल्यामुळे अत्यंत व्यथित आहे. जखमींनी लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे. स्थानिक प्रशासन सर्वतोपरी मदत करत असून मृतांच्या कुटुंबियांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधी’तून 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपये मदत देण्यात येणार आहे.
0000