नवी दिल्ली येथे माजी प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त अभिवादन – महासंवाद
नवी दिल्ली, दि. १४: देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदन येथे अभिवादन करण्यात आले.
कोपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
महाराष्ट्र परिचय केंद्रातही पंडित जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
०००