अमरावती जिल्ह्यातील मतदार जनजागृती रॅलीत सजविलेल्या बैलगाडीचे आकर्षण – महासंवाद
अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्वीप उपक्रमात पिंक फोर्स समितीने शिराळा येथे मतदार जनजागृती रॅली काढली. या रॅलीत सजविलेली बैलगाडी नागरिकांचे आकर्षण ठरली. या रॅलीत जिल्हा नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांनी सहभागी होत मतदार चिठ्ठीचे वाटप केले.
शिराळा गावात रॅली काढण्यात आली. उपस्थितांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. सहभागी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ अशा घोषणा दिल्या. गावफेरीत मतदार चिठ्ठीचे वाटप करण्यात आले. रॅलीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास मरसाळे यांच्यासह अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, आशा सेविका, शिक्षक आदींनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. उपस्थितांना मतदान करण्याची शपथ देण्यात आली.
विस्तार अधिकारी योगेश वानखडे, कल्पना ठाकरे, आशिष गाडेकर, मंगेश मानकर, राजेश श्रीखंडे, आरती चिटके, जिल्हा स्वीप कक्षाचे संजय राठी, राजेश सावरकर, हेमंतकुमार यावले, अमरावती तालुका स्वीप कक्षाचे विनायक लकडे यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.
00000