जळगाव जिल्ह्यात मतदार जनजागृती मोहिमेअंतर्गत डिजिटल चित्ररथास प्रारंभ – महासंवाद
जळगाव दि. ११ (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्यात मतदान होणार आहे. त्याकरिता केंद्रीय संचार ब्यूरो विभागीय कार्यालय, पुणे यांच्यामार्फत जिल्ह्यात दिनांक 11 पासून ते 20 नोव्हेंबर पर्यंत डिजिटल चित्ररथ मार्फत मतदार जनजागृती करण्यात येत आहे.
या अभियानाचा प्रारंभ जिल्हा परिषदेच्या प्रागंणात मा मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत सर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दिशा संस्था, जळगाव यांच्यामार्फत श्री. विनोद ढगे व चमूने पथनाट्य सादर केले. त्यानंतर श्री. अंकित यांनी उपस्थितांना मतदानाची शपथ देत उपक्रमास शुभेच्छा देऊन चित्ररथास हिरवा झेंडा दाखविला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केंद्रीय संचार ब्यूरोचे नोडल ऑफिसर पंकज दाभाडे यांनी केले. या प्रसंगी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण तथा नोडल अधिकारी स्वीप योगेश पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद भाऊसाहेब अकलाडे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद सुनील पाटील तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
०००