चिखली विधानसभा मतदारसंघात पाच मतदान केंद्राची वाढ; आता ३१७ मतदान केंद्र – महासंवाद

0 1




चिखली विधानसभा मतदारसंघात पाच मतदान केंद्राची वाढ; आता ३१७ मतदान केंद्र – महासंवाद

बुलडाणा, (जिमाका) दि.7:  विधानसभा निवडणुकीत मतदारांना मतदान करणे सोईचे व्हावे, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारसंघात मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार 23- चिखली विधानसभा मतदारसंघात पाच नवीन मतदार केंद्राची निर्मिती करण्यात आली असून आता चिखली मतदारसंघात 317 मतदान केंद्र झाले आहेत.

मतदान केंद्राच्या रचनेत सुसूत्रता आणण्यासाठी ज्या मतदान केंद्रांवर मर्यादेपेक्षा जास्त मतदार आहेत  किंवा दोन गावातील मतदार एकाच मतदान केंद्रांना जोडण्यात आलेले होते, असे सर्व मतदान केंद्र मिळून जिल्ह्यात नव्याने 23 मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये चांधई, कोलारी, गिरोला व चिखली येथे मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे चिखली विधानसभा मतदारसंघात 317 मतदान केंद्र झाले असून शहरी भागात 51 तर ग्रामिण भागात 266 मतदान केंद्र आहेत. नवीन मतदान केंद्राच्या निर्मितीमुळे कुटुंबातील सर्व मतदारांची नावे एकाच मतदान केंद्रावर उपलब्ध होणार आहेत.

लोकसभेला जिल्ह्यात 2 हजार 265 मतदान केंद्रे होती. यात 23 नवीन मतदान केंद्रांची वाढ होऊन 2 हजार 288 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहेत. दि. 1 जुलै 2024 अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनर्रीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्र सुसूत्रीकरणांतर्गत मतदान केंद्रात वाढ करण्यात आली आहे.

मतदारसंघात पाच नवीन मतदार केंद्राची वाढ

  1. चांधई येथील मतदारांना 41-धोडप येथील मतदान केंद्रावर जाण्यासाठी दोन कि.पेक्षा जास्त अंतर जावे लागत असल्याने 42-चांधई जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा येथे नविन मतदान केंद्र तयार करण्यात आले.
  2. कोलारी गावातील मतदारांना 43-ब्रम्हपूरी येथील मतदान केंद्रावर जाण्यासाठी दोन कि.पेक्षा जास्त अंतर जावे लागत असल्याने 45-कोलारी जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा येथे नविन मतदान केंद्र तयार करण्यात आले.
  3. गिरोला गावातील मतदारांना 83- हातनी येथील मतदान केंद्रावर जाण्यासाठी दोन कि.पेक्षा जास्त अंतर जावे लागत असल्याने 86-गिरोला येथील मतदारांचे गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा परिषद मराठी पुर्व माध्यमिक शाळा, गिरोली येथे नविन मतदान केंद्र तयार करण्यात आले.
  4. 184-चिखली नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा मतदान केंद्रावर 1 हजार 400 पेक्षा जास्त मतदार झाल्यामुळे 188-नगर परिषद व्यायाम शाळा गांधीनगर चिखली येथे मतदान केंद्र तयार करण्यात आले.
  5. 194- चिखली जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा मतदान केंद्रावर 1 हजार 400 पेक्षा जास्त मतदार झाल्यामुळे मतदान केंद्र क्रमांक 199-चिखली औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील खोली क्रमांक 2 येथे मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत.

प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार 7 हजार 499 नवमतदार

 23-चिखली मतदारसंघात 3 लक्ष 5 हजार 718 मतदार असून त्यामध्ये 1 लक्ष 57 हजार 170 पुरुष तर 1 लक्ष 48 हजार 546 महिला व 2 तृतीयपंथी मतदार आहेत. 85पेक्षा जास्त वयोमान असलेले मतदार 5 हजार 632 असून 2 हजार 85 पुरुष तर 3 हजार 547 महिला मतदार आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये प्रथमच मतदानाचा हक्क बजावणारे 7 हजार 499 नवमतदार असून 4 हजार 885 पुरुष तर 2 हजार 614 महिला नवमतदार आहेत.

मतदान यादीत नाव असल्याची मतदारांनी खात्री करावी- जिल्हाधिकारी

भारत निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या कार्यक्रमानुसार दि. 20 नोव्हेबर 2024 रोजी मतदान होणार आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्व मतदारांनी मतदानाच्या दिवशी मतदान करावे. यासाठी मतदारांनी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करुन घ्यावी. मतदार केंद्र जाणून घेण्यासाठी व्होटर हेल्पलाईन ॲप किंवा voters.eci.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. तसेच मतदार नोंदणी किंवा मतदान केंद्राची माहिती शोधण्याच्या बाबतीत काही मदत हवी असल्यास 1950 या टोल फ्री क्रमांक किंवा चिखली मतदारसंघासाठी हेल्प लाईन क्रमांक 18002336363 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

00000







Source link

Leave A Reply

Your email address will not be published.