जळगाव जिल्हातील विधानसभा निवडणुकांची पूर्वपिठीका प्रकाशित – महासंवाद

0 4




जळगाव जिल्हातील विधानसभा निवडणुकांची पूर्वपिठीका प्रकाशित – महासंवाद

जळगाव, दि. २९ (जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 महाराष्ट्र राज्यात सुरु आहे. निवडणुकीत सर्वाधिक लोकशिक्षणाचे कार्य प्रसारमाध्यमाकडून केले जाते. त्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या सहकार्याने, जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार जिल्हा माहिती कार्यालयाकडून निवडणुकीचा 1962 पासूनचा मागोवा घेतलेली जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदार मतदारसंघाच्या पूर्वपिठीकेचे प्रकाशन मंगळवार २९ रोजी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील हे उपस्थित होते.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने माध्यमे तसेच अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या या पूर्वपिठीकेत जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा निहाय 1962 सालापासून 2019 पर्यंत घेण्यात आलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीतील विजय / पराभूत उमेदवार त्यांना मिळालेले मतदान याबाबतचा सर्वंकष आढावा घेण्यात आला आहे. तसेच माध्यम प्रामाणिकरण आणि सनियंत्रण समितीच्या कामकाज, आदर्श आचार संहितेत ‘ काय करावे, काय करू नये ‘ या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे. तसेच या पूर्वपीठिकेत विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन पर मनोगत प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यासोबतच प्रथमच या जिल्ह्यातील सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे छायाचित्रासह माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने महत्वाचे दूरध्वनी क्रमांक देखील या पुस्तिकेत प्रकाशित करण्यात आलेले आहेत.

या पुस्तिकेसाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अंतुर्लीकर व जिल्हा निवडणूक शाखेचे सहकार्य लाभले आहे.

०००







Source link

Leave A Reply

Your email address will not be published.