क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन
मुंबई, दि. ३: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनीही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले.
०००