पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून सामुदायिक विवाह सोहळ्यातील नवदाम्पत्यांना शुभेच्छा

0 6

सोलापूर, ३१ (जिमाका): येथील लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यातील ५२ नवदाम्पत्यांना उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्य मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी खासदार जय सिद्धेश्वर स्वामी, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, रोहन देशमुख, परमपूज्य जगद्गुरु शिवाचार्य महाराज, हरिभक्त सुधाकर महाराज इंगळे, हिरेमठ महाराज यांच्या सह जिल्ह्यातील सर्व संत मंडळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, हा सर्वधर्मीय विवाह सोहळा खूप चांगला उपक्रम असून लोकमंगल फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक काम केले जात आहे. याचा लाभ परिसरातील सर्व गरजू लोकांना होत आहे. यात सामाजिक जबाबदारीचे भान राखले जात आहे. सर्व ५२ नवदाम्पत्यांना पुढील वैवाहिक जीवनासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी आमदार सुभाष देशमुख यांनी लोकमंगल फाउंडेशनच्या विविध कामांची माहिती दिली. मागील 18 वर्षापासून सामुदायिक विवाह सोहळा घेतला जात असून आज पर्यंत 40 सोहळ्यातून 3 हजार 75 जोडप्यांचे विवाह केल्याची माहिती दिली.

प्रारंभी 52 जोडप्याचा आक्षता सोहळा झाला, त्यांनतर कन्यादान करण्यात आले.

०००

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.