बीटिंग रिट्रीट आणि टॅटू सोहळा २०२३ राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत संपन्न
मुंबई, दि.14 : पश्चिम नौसेना कमांड, मुंबई यांच्यावतीने घेण्यात आलेला बीटिंग रिट्रीट आणि टॅटू सोहळा 2023 राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी नौदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या सोहळ्यात प्रथम नौदलाच्या संगीत बँडचे प्रदर्शन, सुर्यास्त सोहळा, फ्लॅाय पास्ट, कन्टीन्यूटी ड्रील, सेलर्स हॉर्नपाईप नृत्य, लाईट टॅटू ड्रमर नृत्य आदींचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
००००