अहमदनगर जिल्ह्यातील काद्यांला रास्त भाव मिळणार नगर येथे लाल कांदा  खरेदी केंद्र लवकरच सुरु होणार – केंद्रीय कृषी सचिव यांचे आश्वासन

0 9

नवी दिल्ली  12 : नाशिक, छत्रपती संभाजी नगर आणि पुणे येथे कांदा उत्पादनाला मिळत असलेला बाजारभाव, अहमदनगर जिल्ह्यालाही मिळण्याबाबत तसेच शिर्डी, अहमदनगर  येथे लाल कांदा खरेदी केंद्र  त्वरित  सुरु करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश केंद्रीय कृषी सचिव रोहित कुमार सिंग यांनी दिल्याची माहिती शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव‍राव लोखंडे यांनी दिली.

खासदार श्री. लोखंडे यांनी याबाबत केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री पियुष गोयल यांची लोकसभा परिसरातील त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी केंद्रीय कृषी विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग उपस्थित होते.   श्री. लोखडे यांनी श्री. गोयल यांच्याकडे कांदा खरेदी भावाच्या संदर्भात तीन महत्वाचे मुद्दे मांडले व याबाबत सविस्तर चर्चा केली. नाशिक, छत्रपती संभाजीनगर व पुणे जिल्ह्याप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातही भाव मिळण्याकरिता संबंधीतांना आदेश देण्याची विनंती केली.

अहमदनगर येथे लाल कांदा खरेदी केंद्र  त्वरित सुरु करण्याची  व केद्र शासनाकडून कांदा निर्यात बंदी  हटवून त्याची निर्यात लवकर सुरु करण्याचीही मागणी केली. सोबतच तातडीने केंद्र शासनाकडून नाफेड आणि  एनसीसीएफ कडून कांदा खरेदी करुन चांगला भाव देण्यात यावा अशीही मागणी यावेळी केली.

००००

 

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.