उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ‘सुयोग’ येथे पत्रकारांशी संवाद – महासंवाद

0 19

नागपूर, दि. १२ :  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सुयोग पत्रकार निवास येथे भेट दिली व विविध माध्यम प्रतिनिधींसोबत मनमोकळा संवाद साधला.

शिबीरप्रमुख दिलीप जाधव, माहिती संचालक हेमराज बागुल यांनी प्रारंभी त्यांचे स्वागत केले. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सुयोग येथील व्यवस्थेची पाहणी केली व पत्रकारांशी अनौपचारिक वातावरणात मनमोकळा संवाद साधला.

शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने प्राधान्य दिले असून विविध योजनांच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या मदतीबाबत माहिती त्यांनी दिली. राज्यातील विविध विषय तसेच प्रश्नासंदर्भात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधला.

कांदा व इथेनॉलबाबतचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. दूध दराच्या प्रश्नासंदर्भात मार्ग काढण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

यावेळी प्रमोद हिंदुराव, संजय खोडके, माहिती संचालक डॉ. राहूल तिडके यांच्यासह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.

0000000

 

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.