रेशीम संचालनालयातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया रद्द
नागपूर दि. ११ : रेशीम संचालनालयाच्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदांसाठी १३ मार्च २०२० रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. कोविड १९ साथ व प्रशासकीय कारणांमुळे भरती होऊ शकली नाही. त्यामुळे ही प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर, आदी रिक्त पदांसाठी ही जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. रेशीम संचालनालयाकडून १२४ रिक्त पदांची भरती प्रस्तावित असून याबाबत लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल, असे रेशीम संचालक गोरक्ष गाडीलकर यांनी कळविले आहे.
०००