नौदल दिन पूर्वतयारीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा
सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जिमाका) : मालवण किनाऱ्यावरील राजकोट येथे ४ डिसेंबर रोजी नौसेना दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. हा कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची पाहणी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्योत नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल तसेच नौदलाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राजकोट येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आणि राजकोट किल्ल्याच्या कामाची पाहणी केली. तसेच टोपीवाला बोर्डिंग ग्राऊंड येथील हेलिपॅडची देखील पाहणी करून विविध सूचना केल्या.