संविधान दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पालकमंत्र्यांचे अभिवादन
यवतमाळ, २८ (जिमाका) : भारतीय संविधान दिनानिमित्त पालकमंत्री संजय राठोड यांनी यवतमाळ शहरातील संविधान चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत भारतीय संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. प्रास्ताविकेचे मुख्य वाचन इयत्ता चौथीमध्ये शिकणारी अनुजा आनंद देवतळे हिने केले. यावेळी पालकमंत्र्यांनी संविधान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
या रॅली प्रसंगी प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, समाज कल्याण सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर, तहसीलदार योगेश देशमुख, अनामी फाऊंडेशनचे सदस्य, अनुयायांची उपस्थिती होती.
‘संविधान जागर रॅली’चा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते शुभारंभ
भारतीय संविधान दिनानिमित्त यवतमाळ शहरात संविधान जागर अर्थात वॉक फॉर संविधान रॅली काढण्यात आली. या रॅलीला पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग पुणे यांच्या निर्देशानुसार अनामी फाऊंडेशन आणि समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या विद्यमाने शहरातील संविधान चौक येथे या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, समाज कल्याण सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर, तहसीलदार योगेश देशमुख, अनामी फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते.
या रॅलीसाठी संविधान विचार मंच, सत्यशोधक मैत्री संघ, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, समता पर्व प्रतिष्ठान, स्मृती पर्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कृती समिती, बानाई, महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना, भारतीय बौध्द महासभा, समता सैनिक दल, ऑफिसर्स फोरम, भीम टायगर सेना, ऑल इंडिया पॅन्थर सेना, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी असोसिएशन, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, यवतमाळ यांनी परिश्रम घेतले.
समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
यवतमाळ येथील समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालय येथे भारतीय संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व संविधान प्रास्तविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनी शुभेच्छा दिल्या.
०००