‘दिलखुलास’ कार्यक्रमात कामा रुग्णालयाचे डॉ.तुषार पालवे यांची मुलाखत
मुंबई, दि. 20 :माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास‘ कार्यक्रमात ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम‘ या विषयावर कामा रुग्णालयाचे अधीक्षक तथा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. तुषार पालवे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.
आजची बालके हे उद्याचे भविष्य आहेत. बालकांचे आरोग्य सुदृढ असावे म्हणून सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम‘ राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय बालस्वास्थ्य हा कार्यक्रम काय आहे, राज्यात या कार्यक्रमाची अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात येत आहे, राज्यातील किती मुलांची या कार्यक्रमांतर्गत तपासणी आणि उपचार करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती डॉ. पालवे यांनी ‘दिलखुलास‘ कार्यक्रमातून दिली आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमातून डॉ.पालवे यांची मुलाखत उद्या मंगळवार दि. 21, बुधवार दि. 22, गुरुवार दि. 23 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर‘ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.
००००