दौलत नगर येथे उभारण्यात आलेल्या विश्रांतीगृहाचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते उद्घाटन
सातारा दि. 17 : पुष्पगुच्छ आणि महागड्या भेटी यांना फाटा देत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यातर्फे शालेय वह्यांच्या स्वरुपात शुभेच्छा स्वीकारल्या जातील असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत 13 टनाहून अधिक वह्या शुभेच्छांच्या स्वरुपात पालकमंत्री यांना भेट दिल्या. यावेळी पालकमंत्री यांची शुभेच्छा स्वरुपात मिळालेल्या वह्यांची तुला करण्यात आली. वह्याच्या स्वरुपात दिलेल्या शुभेच्छा व आर्शिवाद पाहुन आपण भारावरुन गेल्याची प्रतिक्रयाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी व्यक्त केली.
दौलत नगर येथे उभारण्यात आलेल्या विश्रांतीगृहाचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते उद्घाटन
पाटण तालुक्यातील मौजे दौलत नगर येथे लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकाच्या परिसरात पाच कोटी रुपये खर्चून उभारण्यात असलेल्या अत्यंत देखण्या अशा विश्रांतीगृहाचे उद्घाटन पालकमंत्री शंभूराजे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता संजय सोनवणे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
6269 चौ. फूट क्षेत्रफळावर उभारण्यात येत असलेल्या विश्रांती गृह परिसरामध्ये पार्किंग मजला, ध्वज कट्टा व खांब, फर्निचर, बालोद्यान सुशोभीकरण, विश्रांती गृह व परिसर विद्युतीकरण ही कामे करण्यात येत आहे.
यामध्ये विश्रांती गृहाच्या इमारतीचे काम पूर्ण झाले असून रंगकाम प्लंबिंग व इतर किरकोळ कामे प्रगतीत आहेत. फर्निचरचे कामही प्रगतीपथावर आहे. बालोद्यान व परिसर सुशोभीकरणाचे काम निविदा स्तरावर असून स्मारक परिसरात ध्वज कट्टा व ध्वज उभारण्यात आला आहे.
0000