पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे शिवडीत २५ नोव्हेंबरला आयोजन
मुंबई, दि. १६ : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर कार्यालयामार्फत शिवडी येथील प्रबोधनकार ठाकरे महानगरपालिका शाळेत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० या वेळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील नोकरी इच्छुक बेरोजगार युवक आणि युवतींसाठी रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई शहर कार्यालयाचे सहायक आयुक्त रवींद्र सुरवसे यांनी केले आहे.
०००
श्रद्धा मेश्राम/ससं/