भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांचे मुंबई येथून प्रयाण
मुंबई, दि. १० :- भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांचे आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून भूतानकडे प्रयाण झाले. यावेळी कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, राजशिष्टाचार विभागाचे सहसचिव रामचंद्र धनावडे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
000