राज्यपाल, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राजभवन येथील सचिवालयाचे उद्घाटन
मुंबई, दि. १६: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते आज दुपारी राज्यपालांच्या सचिवालयाचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या सचिवालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उद्धाटनानंतर सचिवालयाची पाहणी उपस्थित मान्यवरांनी केली.
मुख्यमंत्री यांनी घेतली राज्यपाल यांची भेट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज रत्नागिरीचा दौरा नियोजित होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांच्या सचिवालयाचे उद्धाटन होणाऱ्या इमारतीची पाहणी केली. यावेळी मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, बंदरे व खानिकर्म मंत्री दादा भुसे उपस्थित होते.
000
वर्षा आंधळे/विसंअ