शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यातील पाझर तलावाच्या कामांना तात्काळ मान्यता द्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0 13

मुंबई, दि. २ : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील विविध गावांमध्ये जलसंधारण विभागांतर्गत प्रस्तावित कामांना तत्काळ मान्यता देऊन ही कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.

शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये जलसंधारण विभागाच्या माध्यमातून करावयाच्या कामांसंदर्भात आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. आमदार विनय कोरे यांच्यासह जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी  यांचेसह जलसंधारण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शाहूवाडी तालुक्यातील गोगवे पैकी तळपवाडी, बजागवाडी, माण क्र. १ आणि २, म्हालसवडे, गुजरवाडी, शहापूर, पणुंद्रे, पिंपळेवाडी येथील पाझर तलावांची दुरुस्ती करण्यासाठी सुमारे ६.१३ कोटी रुपयांचा प्रस्ताव आमदार डॉ. कोरे यांनी शासनाकडे मान्यतेसाठी सादर केला आहे. त्याशिवाय शाहूवाडी तालुक्यातील पिशवी, साळशी पैकी पोवारवाडी, कुंभवडे येथे पाझर तलाव बांधण्याचा तर सावे, पोखले येथे आणि पन्हाळा तालुक्यातील माले, शहापूर येथे द्वारयुक्त बंधारा आणि शेंबवणे पैकी धुमकवाडी येथे  पाझर तलाव बांधण्याचा सुमारे २४.७७ कोटी रुपयांचा प्रस्ताव जलसंधारण महामंडळाला सादर केला आहे. हे प्रस्ताव तपासून या कामांना मान्यता देण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी  राहुल रेखावार यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील पाच गावांमधील तलावांच्या कामाचा समावेश अमृत सरोवर योजनेत करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

०००

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.