कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रतिची संसाधने उपलब्ध करुन देणे आवश्यक – पालकमंत्री संजय राठोड – महासंवाद

0 11

यवतमाळ, दि २ डिसेंबर :- शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडून उच्च दर्जाच्या कामाची अपेक्षा करताना त्यांना चांगल्या प्रतिची संसाधने उपलब्ध करून देणेही आवश्यक आहे. जिल्हाधिकारी यांनी महसूल विभागाला अद्ययावत  करण्यासंदर्भात संसाधने पुरविण्याचे उचललेले पाऊल अतिशय कौतुकास्पद आहे. इतर विभागात सुद्धा अशी अद्यावत संसाधने उपलब्ध करून देता येतील. त्यासाठी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणुन सी. एस आर मधुन निधी उपलब्ध करुन देता येईल,असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे महसूल विभागांना संगणक व संबंधित साहित्य पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक पवन कुमार बनसोड, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद सिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, तसेच महसूल विभागातील इतर अधिकारी उपस्थित होते.

भूसंपादनाच्या दोन टक्के सेवा शुल्क निधितुन  कार्यालयात अद्ययावत साधनसामग्री खरेदी, इंधन इत्यादीसाठी हा निधी खर्च करता येतो. महसूल विभागात अद्ययावत संगणक व इतर संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी या निधीतून २१० संगणक, ३० ऑल इन वन संगणक, प्रिंटर व स्कॅनर खरेदी करण्यात आले. सदर साहित्य तहसीलदार, अप्पर जिल्हाधिकारी, खनिकर्म, रोहयो, पुरवठा तसेच इतर महसूल अधिकाऱ्यांच्या कार्यालयात वितरित करण्यात आले.

०००००००००

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.