नाशिकच्या अनाथ आश्रमातील लैंगिक छळ प्रकरणी चौकशी समिती स्थापन करून सात दिवसात अहवाल सादर करा – महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा

0 12

मुंबई, दि. 28 : नाशिकच्या अनाथ आश्रमातील संचालकाने आश्रमातील सहा अल्पवयीन मुलींचा लैगिंक छळ केल्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्वरित एक समिती स्थापन करून विभागाला सात दिवसात अहवाल सादर करावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले आहेत.

दिनांक 27 नोव्हेंबर रोजी एका वृत्तपत्रात, नाशिकच्या अनाथ आश्रमातील संचालकाने सहा अल्पवयीन मुलींचा लैगिंक छळ केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून याबाबतीत महिला व बालविकास विभागामार्फत सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

*******

संध्या गरवारे/विसंअ/

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.