पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतील – पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

0 12

पालघर दि 26 : सागरी, नागरी, डोंगरी क्षेत्र लाभलेल्या पालघर जिल्ह्यामध्ये पर्यटनाला विशेषवाव आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास करून पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतील असा विश्वास पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, व महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला.

जव्हार येथे राष्ट्रीय जनजाती गौरव दिवसानिमित्त लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी श्री. लोढा बोलत होते

पर्यटनाला चालला देण्यासाठी तसेच पर्यटकांच्या सोयीसाठी पर्यटनाच्या दृष्टीने सर्व मुबलक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील यामुळे पर्यटकांची संख्या वाढून स्थानिक नागरिकांना नवीन रोजगार उपलब्ध होऊन बेरोजगारीची समस्या सुटेल असा विश्वासहि श्री. लोढा यांनी यावेळी व्यक्त केला

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.